
‘अमित शहांनी किती मर्डर केले मला सगळं माहित आहे’
शिवसेनेच्या या नेत्यांची शहासह भाजपावर जहरी टिका, गुलाबरावांना डिवचले
मुंबई दि ७ (प्रतिनिधी) – शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिल्लीवरून एक राक्षस येतो आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो, अशा शब्दात खैरेंनी अमित शहा यांना टोला लगावला शिवाय त्यांनी शहा खुनी असल्याचेही म्हटले आहे.
अमित शहा यांनी मुंबई फक्त भाजपा असावी आणि धोका देणाऱ्या ठाकरेंना धडा शिकवण्याचे आवाहन केले आहे. त्याला खैरेंनी प्रत्युत्तर दिले आहे खैरे म्हणाले “दिल्लीवरून एक राक्षस येतो आणि उद्धव साहेबांच्या बाबतीत बोलतो हे योग्य नाही. अमित शहा स्वतः काय होते मला माहित आहे. त्यांनी काय-काय घोटाळे केले, मर्डर केले मला सगळं माहित आहे. असे ते म्हणाले यावेळी त्यांनी मोदींवर निशाना साधला. भाजप मोदींना पक्षातून काढत होते. मात्र बाळासाहेबांनी सांगितलं होत काढू नका म्हणून, असे सांगत मला अहमदाबादला मोदींकडे पाठवले होते. माझ्याच पक्षाचे लोकं मला काढण्यासाठी प्रयत्न करतायत असे नरेंद्र मोदी मला स्वतः म्हणाले होते, असेही खैरे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटलांना टपरीवाला म्हणत टोला लगावला आहे.
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा यांनी सोमवारी मुंबई दौरा केला. त्यांच्या याच दौऱ्यातून त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. याच टिकेनंतर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपला उत्तर दिले जात आहे.पण खैरेंची टिका मात्र भाजपाच्या जिव्हारी लागणारी आहे.