
लग्नात जावांचा तुफान डान्स पाहुन नवी नवरी थक्क
डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, पाहुणेही चकित, मेकअपही होता खास
पुणे – लग्न असेल तर घरातील सदस्य खूपच आनंदात असतात. कुटुंबाची वीण घट्ट असेल तर मग घरातील लहान सदस्याच्या लग्नात मोठ्याचा अंदाज वेगळाच असतो. सध्या सोशल मिडियावर दिराच्या लग्नात दोन जावांनी केलेला डान्स जोरदार व्हायरल होत आहे.
दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असतो ही गोष्टी काही सांगायची गरज नाही. कारण ते नातंच तसं असते. व्हायरल व्हिडिओत दिराच्या लग्नात दोन वहिणींनी केलेला डान्स जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, ‘हम आपके है कोण’ या हिंदी चित्रपटातील ‘लो चली मै अपनी देवर की बारात लेके’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत महिलेचा दीर देखील आपल्या वहिनीसोबत थिरकताना दिसतोय. वहिनींच्या डान्स स्टेप्स पाहून वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या-शिट्ट्या वाजवत आहेत. विशेष म्हणजे वहिनींना केलेला मेकअप देखील लक्ष वेधून घेत आहे. लो चली मै अपले देवर की बारात ले के, या गाण्यावर त्या डान्स करत आहेत. तर नवरदेवसुद्धा वहिनींना साथ देण्यासाठी डान्स स्टेप करताना दिसत आहेत. या दरम्यान नवी नवरी सुद्धा डान्स करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ deepabhujbal_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शनही वहिनी म्हणजे प्रत्येक दिराची दुसरी आईच असं देण्यात आलं आहे. यावर नेटकरी आता प्रतिक्रिया देत आहेत.