Latest Marathi News
Ganesh J GIF

सोनीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली?

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, माहेरच्यांचा सासरच्यांवर गंभीर आरोप, सोनीसोबत काय घडल?

जळगाव – जळगाव तालुक्यातील धानवड येथे २२ वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास आत्महत्या केली. मात्र, तिच्या माहेरच्यांनी ही आत्महत्या नसून तिला ठार मारण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सोनी चेतन चव्हाण वय २२ असं मयत महिलेचं नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनहसार, धानवड येथे सोनी चव्हाण या आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. १७ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सोनी हिने घरी कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर विवाहितेच्या सासरकडील मंडळींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. आश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषीत केले. मयत सोनी चव्हाणच्या आई-वडिलांनी तिच्या पती चेतन चव्हाण आणि सासरच्या मंडळींवर खूनाचा आरोप केला आहे. चेतनला दारूचे व्यसन होते आणि तो वारंवार सोनीला मारहाण करत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून तिचे पती चेतन गजानन चव्हाण याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे दारू पिऊन मारहाण करणे सुरूच होते. याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने यापुर्वी देखील विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ही आत्महत्या नसून तिला गळफास लावून मारण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

मुलीला ठार मारणाऱ्या पतीसह तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सोनीच्या कुटुंबीयांनी केली आहे. मयत विवाहितेच्या पश्चात सार्थक प्रथमेश ही दोन मुलं, आई, वडील, एक भाऊ, लहान बहिण असा परिवार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!