
नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामुळे कॉर्पोरेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सात जणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार असलेली एचआर निदा खान मात्र गेल्या 20 दिवसांपासून फरार आहे.

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहेत. याचदरम्यान, टीसीएसमधल्या पीडितेच्या जबाबातून अनेक संतापजनक बाबी समोर आल्या आहेत. रजा मेनन आणि आसिफ अन्सारींकडून मुलींचा छळ सुरु होता. तुझी फिगर झिरो आहे, गरज पडली तर कधीही बोलव…असं दोघं म्हणायचे. तसेच गुढीपाडव्याला आसिफ अन्सारीने साडीचा पदर ओढल्याची आपबिती टीसीएसमधील एका पीडितेने सांगितली आहे.

टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपींकडून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईलमधून व्हॉट्सअॅप ग्रुपबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे. दररोज ग्रुप लीडर ग्रुपमधून वेगवेगळे आक्षेपार्ह मॅसेजने तरुणींचे विनयभंग केले जात असल्याची माहिती आली आहे.

हिंदू तरुणी आणि महिलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे मानसिक छळवणूक करण्याचा प्रयत्न सुरु होता. ऑफिसमध्ये दररोज नेटचा पासवर्ड अश्लील नावाने किंवा हिंदू मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने सेट केले जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. शफी शेख आणि रझा मेमन यांच्या मोबाईलमधील काही डेटा डिलीट केल्याचीही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे तपास यंत्रणेकडून अधिकचा तपास सुरू आहे. तरुणी आणि महिलांचे लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचा पुन्हा पोलीस ताबा घेऊन प्रकरणातील अधिकचा तपास केला जाणार आहे.

