Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा? भाजप खासदार मेधा कुलकर्णींची पाहणी आणि कडक इशारा

“पुणे शहरातील रेल्वे स्टेशन बाबत वारंवार तक्रारी येत होत्या. या सगळ्या तक्रारी बाबत पाहणी केली. अनेक त्रुटी लक्षात आल्या आहेत. डीआरएमला भेटणार आहे. त्यांना काही लोकांबाबत तक्रारी दिल्या होत्या, यंत्रणा कुठलीही नाही.

मोठ्या प्रमाणात सुरक्षा त्रुटी रेल्वे स्टेशनवर जाणवल्या आहेत. पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट काढून आले. पण अनेकजण विना तिकीट या ठिकाणी फिरत आहेत, घटना घडून गेल्यानंतर आता अनेक त्रुटी जाणवल्या आहेत” असं खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या. “अनेक व्यसनाधीन लोक आढळले आहेत. व्यसनी लोक येत आहेत. इथ दुर्घटना झाल्या आहेत. चोऱ्या,अत्याचार घडले आहेत. या सगळ्या त्रुटींबाबत केंद्राला अहवाल देणार” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या. केंद्राकडून रेल्वे स्टेशन्सचा विस्तार, विकास सुरु असल्याचा नेहमीच दावा केला जातो. पण आज मेधा कुलकर्णींना विकास आणि वास्तव यातला फरक दिसून आला.

“अनेक तक्रारी आहेत. अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना माहिती देणार. त्यांच्या चर्चेतून समाधानकारक मिळाले तर ठीक. पुणे रेल्वे स्टेशनवर कुठलीही तपासणी व्यवस्थित होत नाही. गरजूंना स्टॉल दिले जावे. रेल्वे स्टेशन वर अशी यंत्रणा होऊ शकते का, हे पहावे लागेल. काही ठराविक ब्रँड दिले आहेत. रेल्वे स्टेशनवर दारुडे आणि ड्रग्स घेणारे लोक पहायला मिळाले. याला दोषी असणाऱ्यावर कारवाई मागणी करणार” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.‘आओ जाओ घर तुम्हारा’“पुणे रेल्वे स्टेशन पाहणीची माहिती वरपर्यंत पोहचवणार आहे. अक्षरश: या पुणे रेल्वे स्टेशनवर भोंगळ कारभार आहे. सुरक्षा रिपोर्ट केंद्राला देणार. केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे या सगळ्या अडचणी मी लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. इथे टीसी उपलब्ध नाही, आओ जाओ घर तुम्हारा रेल्वे स्टेशनवर सुरू आहे. या ठिकाणचे रेल्वे अधिकारी, पोलिस अधिकारी यांचा हलगर्जीपणा याला जबाबदार आहे त्याची यादी देणार. सुरक्षा व्यवस्था वाढली पाहिजे. अनेक अपहरणं,अत्याचार,चोऱ्या घटना वांरवार घडत आहेत. आजपर्यंत दुर्लक्ष ज्यांनी केलं ते जबाबदार आहेत” असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!