
मुंबईच्या घाटकोपर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.दोन चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून त्यांच्यासमोर नग्न होत अपप्रकार करण्याचा प्रयत्न एक ३५ वर्षीय तरुण करत होता. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे

या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट असून रात्री उशिरापर्यंत नित्यानंद नगरमध्ये तणावाचे वातावरण होते.काय घडलं नेमकं?घरासमोर चार लहान मुली खेळत होत्या. आरोपीने यातील दोन मुलींना ‘तुमचे आई- वडील माझ्या घरात आहेत’ असे खोटे सांगून घराच्या आत बोलावले.

मुली घरात शिरताच त्याने दरवाजा बंद केला आणि त्यांच्यासमोर नग्न होऊन अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत घराचा दरवाजा तोडला. नागरिकांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.


