
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत वारंवार अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या अपघातावरुन संशय व्यक्त करत करत आहेत.एकीकडे अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण राज्यभरात गाजत असताना आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळजनक दावा केला आहे.अजित पवार यांच्या अपघातस्थळी काळी जादू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजित पवार यांच्या अपघाताआधी बारामतीमध्ये काळ्या जादूचे प्रकार करण्यात आले असा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. त्यानंतर आता गोजुबावी येथे पूजेच्या ताटात लिंबांमध्ये सुया टोचलेल्या अवस्थेत साहित्य आढळले. हा प्रकार जाणीवपूर्वक केला जातोय की अघोरी पूजा, असा सवाल मिटकरींनी उपस्थित करण्यात आला आहे. काल रात्री दादांच्या प्रतिमेला काही लोक दिवा बत्ती करण्यासाठी गेले असता त्यांना गोजुबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीत आढळल्या,हे कुणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पुजा प्रकार? असं ट्वीट अमोल मिटकरींनी केले आहे.

मिटकरी यांच्या मते, नोव्हेंबर महिन्यापासून अशा घटनांची मालिका सुरू असून, हा प्रकार सातत्याने घडत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या अपघातावेळीही तत्सम प्रकार आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा तपास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली आहे.एसआयटी चौकशीची मागणीसध्या एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. तसेच, मुंबईत जाऊन सातपुते यांची भेट घेणार असल्याचेही मिटकरी यांनी स्पष्ट केले. बारामतीत घडणाऱ्या या घटनांमागे राजकीय कट आहे का, हे समोर येणे आवश्यक असल्याचेही मिटकरींनी म्हटलं असून अशोक खरात हा भोंदू बाबा यातील मुख्य आरोपी असल्याचं दिसून येणार असेही ते म्हणाले.


