Latest Marathi News
Ganesh J GIF

डिझाईन तर भारी आहे! अंगठीचा फोटो काढतो म्हणाला अन्….

जुन्नर तालुका बेल्हे परिसरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तूप आणि म्हशीचा चीक विकण्याच्या बहाण्याने एका अज्ञात व्यक्तीने वृद्धाची फसवणूक करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या.

अधिकच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९ ते ९:३० च्या दरम्यान एक अनोळखी इसम पीडित वृद्धाच्या घरी आला. मी तुमच्या दूधवाल्याचा भाऊ आहे असे सांगत त्याने घरच्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला त्याने तूप विकले आणि नंतर माझ्याकडे म्हशीचा चीक आहे असे सांगून वृद्धाला घराबाहेर नेले.

बोलण्याच्या ओघात त्याने वृद्धाच्या हातातील सोन्याच्या अंगठ्यांकडे लक्ष वेधले. डिझाईन खूप छान आहे, फोटो काढून सोनाराला दाखवतो, असे सांगून त्याने दोन्ही अंगठ्या हातात घेतल्या. त्यानंतर चीक घेण्यासाठी मोठे भांडे आणा असे सांगून वृद्धाला घरात पाठवले. वृद्ध बाहेर येईपर्यंत आरोपी मोटारसायकलवरून फरार झाला. पीडितांच्या माहितीनुसार, आरोपीचे वय अंदाजे ३५ वर्षे असून त्याने काळा शर्ट परिधान केला होता. त्याचा चेहरा उघडाच होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!