Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! लॉजमधील ‘त्या’ रुमचा दरवाजा उघडला आणि पोलीसही चक्रावले…

पुण्याच्या आंबेगावमध्ये गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. आंबेगावमधील एका लॉजवर गुन्हे शाखेने छापेमारी केली. या छापेमारीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे निदर्शनास आले.या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर एजंटलाही अटक केली आहे. या मोठ्या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आंबेगावमधील लॉजवर गुन्हे शाखेचा छापा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकत चार पीडित महिलांची सुटका केली. या कारवाईत एका एजंटला अटक करण्यात आली आहे. सचिन बाबुराव गायकवाड (वय २८, रा. कोंढवा, पुणे) या एजन्टला ताब्यात घेण्यात आले.गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, पुणे-सातारा रस्त्यावरील “द्वारका लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग” येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाच्या मदतीने खात्री झाल्यानंतर पोलिसांनी लॉजवर अचानक छापा टाकला.

कारवाईदरम्यान लॉजमध्ये आणलेल्या चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच या प्रकरणातील एजंट सचिन गायकवाड याला ताब्यात घेण्यात आले. तो मूळचा लातूर जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुळज गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!