Latest Marathi News
Ganesh J GIF

डोक्यावर टपली मारल्याचा राग ; चाकूने भोसकून केला खून

नागपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. अत्यंत किरकोळ आणि शुल्लक कारणावरून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.राजकुमार पवार असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

या वादाची सुरुवात अतिशय किरकोळ कारणावरून झाली होती. सुरुवातीला मृत राजकुमार पवार यांचा मुख्य आरोपी सोहेल उर्फ जॉनी शेख याच्या एका मित्रासोबत शाब्दिक वाद झाला होता. आपल्या मित्रासोबत वाद सुरू असल्याची माहिती मिळताच आरोपी सोहेल शेख हा दुचाकीवरून तातडीने घटनास्थळी पोहोचला. दोघांमध्ये वाद सुरू असतानाच, राजकुमार पवार यांनी आरोपीला “क्या रे जॉनी” असे म्हटले आणि त्याच्या डोक्यावर टपली मारली. सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर मारलेल्या या टपलीमुळे सोहेलचा राग अनावर झाला. याच रागाच्या भरात त्याने आपल्या कमरेला लपवून ठेवलेला तीक्ष्ण चाकू काढला आणि राजकुमार यांच्यावर सपासप वार केले. हल्ला केल्यानंतर आरोपी सोहेल आपल्या दुचाकीवरून वेगाने पसार झाला.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू

हल्ल्याचा थरार इतका भयानक होता की, चाकू लागल्यानंतरही गंभीर जखमी झालेले राजकुमार काही वेळ तिथेच उभे राहिले. त्यानंतर एका व्यक्तीला सोबत घेऊन ते स्वतः रुग्णालयाच्या दिशेने निघाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

मुख्य आरोपी गजाआड

या थरारक घटनेनंतर उमरेड पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत मुख्य आरोपी सोहेल उर्फ जॉनी शेख याला तात्काळ अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध कलमांनुसार कारवाई केली जात आहे. उमरेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!