
पुण्यातील फेगुवाडी परिसरात 27 मे रोजी दिवसभरात 5 जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला की, विषारु दारुमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी व दापोडी परिसरात बनावट, विषारी गावठी दारू प्राशनामुळे किमान 13 ते 15 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मे 2026 च्या शेवटी समोर आली आहे.मुंबईहून विनापरवाना आणलेल्या घातक मिथेनॉल/केमिकल स्पिरिटपासून ही दारू बनवून ती फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ आणि चतुःशृंगी भागांत विकण्यात आली होती. या प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या पांढरे मळ्यात विषारी दारूमुळे आणखीन एकाचा मृत्यू झाला होता. सम्युवेल लिंकन धैयर्म असे विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पांढरे मळ्यातील विषारी दारूमुळे सहावा बळी झाल्याची नोंद झाली आहे. पुणे आणि फुगेवाडीतील एकूण बळीची संख्या पोहोचली 20 च्या वर असं पोलिसांनी सांगितलं आहे. काल पांढरे मळ्यात पाच जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाल होता. बुधवारी पांढरे मळ्यात दारू प्यायल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दोन दिवस हा घरामध्ये झोपून होता, अशी माहिती घरच्यांनी दिली असून सकाळी त्याचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे.

विषारी दारु प्रकरणात मोठी अपडेट
हडपसर पोलीस ठाण्यातील 3 अधिकारी निलंबित.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले , एपीआय सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलांनी निलंबित करण्यात आली आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसेच तपास पथकाचे इंचार्ज आणि 4 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे.

सीआयडी चे वरिष्ठ अधिकारी तपासासाठी दाखल..
राञीतून विषारी दारू कांडाचे सर्व गुन्हे सीआयडी कडे वर्ग ही झालेत. हडपसर पोलीस स्थानकात विषारी दारू आणि मृत्यू प्रकरणात आहे गुन्हा दाखल करण्यात आली आहे. याचा तपास काल रात्री पुणे पोलिसांकडून सीआयडी कडे वर्ग झाल्यानंतर टीम दाखल झाली आहे.पुण्यात विषारी दारूकांड झाल्यावर हडपसरमध्ये शिवसैनिकांनी सकाळपासून दारू गुत्त्यांची तोडफोड सुरू केलीय… प्रशासन कारवाई करत नाही म्हणून आम्हाला आज दंडूकं हाती घ्यावं लागलंय, आज सकाळपासून आम्ही एकट्या हडपसर भागातले 8 दारू गुत्ते फोडल्याचं नाना भानगिरे यांनी म्हटलंय…आणि ही आपली स्टंटबाजी नाहीतर यापूर्वीही आपण अनेकदा हडपसर भागातल्या दारु अड्ड्यांविरोधात आवाज उठवला, पण प्रशासन लक्षच देत नाही म्हणून आज आम्ही शिवसैनिक हे दारू अड्डे उद्धवस्थ करतोय, असंही नाना भानगिरे, शहराध्यक्ष, शिवसेना, पुणे म्हणाले आहेत.
पुण्यात शिवसैनिक कडून हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त
हडपसर परिसरातील मोहम्मद वाडी काळेपडळ कोंढवा परिसरात दारूचे उध्वस्त करण्यात आले आहेत. फुग्यामध्ये विकली जात होती दारू. शिवसेना शिंदे गटाकडून आक्रमक आंदोलन केले आहे. सकाळपासून शिवसेनेकडून दारूच्या भट्ट्या दारू विक्री करणारी ठिकाण तोडफोड करण्यात आली आहेत. पुण्यात गुलाबो गँगने आंदोलन केले आहे. विषारी दारू कांडाविरोधात आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे. जनता वसाहत परिसरात आंदोलन केलं आहे. दारुचे फुगे फोडून आंदोलन केलं आहे.

