मुंबई दि २४(प्रतिनिधी) – शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी शिवाजी पार्क मैदानावर कोण दसरा मेळावा घेणार याचा फैसला उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला. यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आता २७ तारखेकड होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात सध्याच्या सरकारबाबत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
सर्वाच्च न्यायालयात २७ सप्टेबरला निकाल देणं अपेक्षित आहे. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र व्हायला हवेत. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. न्यायालयात जर ते अपात्र ठरले तर राज्य सरकारचं कोसळू सकते. ठाकरे शिंदे सरकार लढाईचा फैसला तीन दिवसांवर असताना बापट यांनी शिंदे सरकारच्या भवितव्यावर सूचक विधान केले आहे. ते म्हणाले “जे १६ आमदार बाहेर पडले ते दोन तृतीयांश होत नाहीत. तर विलीनीकरणाच्या कायद्यानुसार, दोन तृतीयांश आमदार बाहेर पडावे लागतात आणि त्यांनी दुसऱ्या कोणत्याही पक्षात विलीन व्हायचे असते. पण हे दोन्हीही झालेले नाही. ते १६ आमदार जर अपात्र झाले त्यात जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत, जर मुख्यमंत्रीच अपात्र ठरले तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहता येत नाही. म्हणजे राज्य सरकारच पडेल. माझ्या अभ्यासानुसार जे १६ आमदार पहिल्यांदा बाहेर पडले होते ते अपात्र होऊ शकतात असा दावा त्यांनी केला आहे.
राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने २७ सप्टेंबर हा दिवस महत्वाचा आहे. कारण या दिवशी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. दसरा मेळाव्याला तेच मैदान मिळवर ठाकरेंनी पहिली लढाई जिंकली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.तर शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.आता २७ सप्टेंबरच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष असणार आहे.