Latest Marathi News
Ganesh J GIF

“पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर हा धुमाकूळ घालेल!”; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर थेट आणि गंभीर आरोप

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान “राजकारणातून रिटायर व्हावं असं वाटतं” असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.

पंकजा मुंडेंच्या विधानावर जरांगेंची प्रतिक्रिया

पंकजा मुंडेंच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या वक्तव्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर हा (धनंजय मुंडे) सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवण्याची ताकद आणि हिंमत पंकजा मुंडेंमध्ये आहे. त्यांनी खूप गरिबीत असलेल्या समाजाला वर आणलं आहे. जर पंकजाताई बाजूला गेल्या, तर हा गोरगरिबांना अन्नापासून वंचित करेल आणि लोकांना जेलमध्ये घालेल.”

“माझ्या खुनाच्या कटात तू आहेस!” – जरांगेंचा खळबळजनक दावा

धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना जरांगे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या घातपाताच्या प्रकरणात आणि खुनाच्या कटात शंभर टक्के तू आहेस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तू बसला होतास. तो सर्व डेटा फडणवीसांकडे आहे,” असा खळबळजनक दावा जरांगेंनी केला.”मी दोन-तीन वेळा तुला वाचवले आहे. जर तू पाप करायचं आणि मराठ्यांना त्रास देणं बंद केलं नाही, तर तुझे वाईट दिवस नक्की येतील. मराठ्यांच्या नादी लागणं बंद कर.”

बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवरून सडकून टीका

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि राजकीय वातावरणावर भाष्य करताना जरांगे पुढे म्हणाले. बीड जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी समाजातील प्रेम तोडायला आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवायला धनंजय मुंडेच कारणीभूत आहेत.खून, चोरी, खंडणी आणि बलात्कार करणाऱ्यांचे समर्थन केल्यामुळेच धनंजय मुंडे संपले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.”तुझ्या अशा वागण्यामुळे आणि चुकीच्या राजकारणामुळे तुझ्या बहिणीलाही सहन करावं लागत आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

“आता मध्ये जायची वेळ आली आहे!”

“मराठ्यांसह सर्वच जातींनी तुला मोठं केलं, पण तू टोळीने ओरबाडून खाल्लंस. ना ओबीसीला मोठा होऊ दिलास, ना मराठ्याला. तू आता तरी शहाणा हो, नाहीतर कोणताही पक्ष तुला जवळ करणार नाही. आता तुझी वेळ संपली आहे!”

– मनोज जरांगे पाटील

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!