
देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या ‘NEET-UG 2026’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) विशेष न्यायालयात ९४ पानांचे आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. ज्यांच्यावर परीक्षेची गोपनीयता राखण्याची जबाबदारी होती, त्याच राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) तीन विषय तज्ज्ञांनी मुख्य सूत्रधार बनून हा पेपर फोडल्याचा अत्यंत धक्कादायक दावा सीबीआयने केला आहे.

NTA च्या ‘या’ ३ विषय तज्ज्ञांचा मुख्य हात!

सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार, एकूण १३ आरोपींपैकी खालील ३ विषय तज्ज्ञांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. पुण्यातील रहिवासी असलेल्या कुलकर्णी यांनी रसायनशास्त्राच्या प्रश्नांची माहिती बाहेर पुरवली.दिल्लीतील निवासस्थानी दररोजचे काम संपल्यानंतर त्या प्रश्नांची संक्षिप्त नोंद करून ठेवत असल्याचे तपासात उघड झाले.मनीषा मांढरे यांच्याकडे इंग्रजी-मराठी भाषांतर आणि पुनर्भाषांतराची जबाबदारी होती.

पुण्यातील सोसायट्यांच्या ॲपवरून पुरावे; ब्युटिशियनद्वारे राजस्थान-हरियाणापर्यंत पेपर!
तपासादरम्यान सीबीआयने अत्यंत आधुनिक पद्धतीचा वापर करून पुरावे गोळा केले आहेत आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांच्या सोसायटीतील प्रवेश-नियंत्रण (Access Control) ॲपमधील नोंदी, बायोमेट्रिक डेटा आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे सीबीआयने तपासाचा धागा जोडला. तज्ज्ञांनी फोडलेली प्रश्नपत्रिका पुण्यातील मनीषा वाघमारे या ब्युटिशियनच्या माध्यमातून राजस्थान आणि हरियाणातील मध्यस्थांपर्यंत पोहोचवण्यात आली. लातूर येथील कोचिंग सेंटर चालक शिवराज मोटेगावकर याचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश या साखळीतील एका विद्यार्थ्याच्या माध्यमातूनच शक्य झाला, ज्याने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली.
NTA च्या सुरक्षेत गंभीर त्रुटी उघड!
चौकशी दरम्यान राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) सुरक्षेतील प्रचंड मोठ्या त्रुटी समोर आल्या आहेत. NTA च्या गोपनीय विभागासाठी कोणतेही स्वतंत्र थेट रेकॉर्डिंग कंट्रोल युनिट (Direct Recording Control Unit) नव्हते. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या या तज्ज्ञांच्या संशयास्पद हालचालींवर कोणाचेही लक्ष राहिले नाही. तसेच, प्रश्नपत्रिका अंतिम करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच त्याच व्यक्तींचा सहभाग असल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.
पालकांमध्ये संतापाची लाट
हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या पेपरफुटी प्रकरणात आता सीबीआयने सबळ पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केल्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

