Latest Marathi News
Ganesh J GIF

“तुला भरपूर पैसे देतो, आमदाराला गोळ्या घालून मार…”; सोलापुरात चालकाला मिळाली धक्कादायक ऑफर

सोलापूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि राजकीय वर्तुळ हादरवणारी बातमी समोर आली आहे. अक्कलकोट विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाहनचालकाला पैशांचे मोठे आमिष दाखवून थेट आमदारांवर गोळ्या झाडण्याची ऑफर दिलनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात तसेच सोलापूर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.

“आमदार दादाला गोळ्या घालून मारून टाक…”

मिळालेल्या माहितीनुसार, ही भयानक घटना सोलापुरातील गजबजलेल्या महावीर चौक परिसरात घडली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय खरेदीसाठी सोलापूर शहरात आले होते. त्यावेळी आमदारांचे वाहनचालक आनंद सुरवसे हे गाडीजवळ थांबले होते. त्याच वेळी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी हे दोघे संशयित चालकाजवळ आले. चालकाला थेट पैशांचे आमिष दाखवत ते म्हणाले. m”तुला आम्ही भरपूर पैसे देतो, तू तुझ्या आमदार दादाला गोळ्या घालून मारून टाक. यातून तुझा मोठा फायदा होईल आणि पुढचं काय ते आम्ही बघून घेऊ.”

चालकाची सतर्कता अन् संशयितांची पळापळ!

अचानक मिळालेल्या या भयानक ऑफरने चालक आनंद सुरवसे काही काळ चक्रावून गेले. मात्र, त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. चालकाने या ऑफरला तात्काळ नकार देत संशयितांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. आपण पकडले जाऊ, या भीतीने दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून लगेच काढता पाय घेतला आणि पळ काढला.

पोलिसांत गुन्हा दाखल; यंत्रणा सतर्क!

घटनेचे गांभीर्य ओळखून चालक आनंद सुरवसे यांनी क्षणाचाही विलंब न लावता सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाणे गाठले. घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती देत त्यांनी पोलिसांत अधिकृत फिर्याद नोंदवली आहे. चालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी या दोघांविरोधात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. थेट लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेशी आणि हत्येच्या कटाशी संबंधित हा प्रकार असल्याने सोलापूर पोलीस यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!