Latest Marathi News
Ganesh J GIF

कदमवाक वस्ती येथील एमआयटी कॉर्नरजवळ PMRDAची पहिलीच मोठी कारवाई; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे-सोलापूर महामार्गावरील एमआयटी कॉर्नर परिसरात PMRDAकडून मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. या परिसरात यापूर्वी अशा प्रकारची कारवाई झालेली नसून, ही या भागातील PMRDAची पहिलीच मोठी कारवाई असल्याचे समोर आले आहे.

कारवाईदरम्यान मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने इमारतीचा काही भाग पाडण्यात आला. इमारत पाडताना मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट निर्माण झाले असून, परिसरात बांधकामाचा मलबा पसरला आहे.

दरम्यान, कारवाईच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एमआयटी कॉर्नर परिसरात PMRDAची ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने या कारवाईकडे नागरिकांचे आणि परिसरातील व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. PMRDAच्या या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. एमआयटी कॉर्नर परिसरात PMRDAकडून इमारतीवर कारवाई सुरू असताना मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!