Latest Marathi News
Ganesh J GIF

‘शिवरायांचा अपमान पाहण्याआधी मेलो असतो तर बरे झाले असते’

पत्रकार परिषदेत उदयनराजे भावूक, भाजपाला दिला निर्वाणीचा इशारा

पुणे दि २८(प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याप्रकारे अपमान होत आहे, तो दिवस पाहण्याआधी मी मेलो असतो तर बरे झाले असते. अशी उद्विग्न प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे. सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या काही दिवसांत किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळावर जाऊन प्रतिकात्मक आंदोलन करणार असल्याचेही राजे यांनी सांगितले आहे.

उदयनराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सरकारला गंभीर इशारा दिला आहे.”आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मान ठेवायचा नसेल तर त्यांचे नाव घेऊ नका. हे असेच सुरु राहिले तर चुकीचा पायंडा पडेल. शिवाजी महाराजांचा अपमान करणे, ही एक फॅशन होऊ जाईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य म्हणजे खडा टाकून पाहण्याचा प्रकार आहे. हे सर्व रोखायचे असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा हक्क नाही, किंबहुना ते घेऊ नये अशी भावना व्यक्त केली. त्याचबरोबर आपण राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना भेटून या मुद्द्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचेही उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.देशातील युगपुरूष आणि राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात राष्ट्रद्रोहासारखी कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणीही राजेंनी केली आहे.

राज्यपालांची हकालपट्टी करण्यासाठी आपण सरकारला वेळ दिला होता पण तो पाळण्यात आला नाही त्यामुळे येत्या काही दिवसांत किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळावर जाऊन प्रतिकात्मक आंदोलन करणार असल्याचे उदयनराजे म्हणाले आहेत. यावेळी छत्रपतींचा अपमान होत असताना एकत्र येऊ आवाज का उठवत नाहीत असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!