
एकनाथ शिंदेच नाही तर या मुख्यमंत्र्यांचा आहे बाबा आणि ज्योतिषांवर विश्वास
कोणी आपला शपथविधी पुढे ढकलला, तर कोणी साधुंनाच केले राज्यमंत्री
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका ज्योतिषाच्या भेटीला गेल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारणात चांगलेच पेटले आहे.एकनाथ शिंदे हे त्यांचे आणि सरकारचे भवितव्य काय हे पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ईशानेश्वर मंदिरात गेले होते, अशी टीका त्यांच्यावर झाली. पण ज्योतिषी किंवा स्वामीला हात दाखवणारे एकनाथ शिंदे पहिलेच मुख्यमंत्री नाहीत याआधीही अनेक मुख्यमंत्री आणि नेत्यांनी स्वामी किंवा ज्योतिषाचा आधार घेतला आहे. त्यातील काही उदाहरणे आज पाहुयात
१) देवेंद्र फडणवीस- महाराष्ट्रातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०१४ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते पण दुस-यांदा मी पुन्हा येईन ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी मिरची हवन केलं होते. मध्य प्रदेशच्या नालखेडा येथील बागलामुखी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून फडणवीसांनी हे हवन करून घेतले होते. उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार या ‘मिरची हवन’मुळे वाचल्याचे फडणवीसांना सांगण्यात आले होते. सुधीर सुर्यवंशी लिखीत ‘चेकमेट- हाऊ बीजेपी विन अॅंड लॉस्ट’ या पुस्तकात यावर लिहिण्यात आले आहे.
२) सत्यसाईबाबाचे भक्त मुख्यमंत्री- काँग्रेस पक्षाचे दोन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण सत्य साहेबाबाचे भक्त होते अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २००९ साली वर्षा या शासकीय बंगल्यावर सत्य साईबाबा आले होते. तर. विलासराव देशमुख हे सत्य साईबाबांचे भक्त होते, त्यांनी आपल्या घरी सत्य साईबाबांचे आदरातिथ्य केले होते. त्यामुळे त्यांच्या हस्ते अंनिसचे नरेंद्र दाभोलकर यांनी पुरस्कार नाकारला होता. त्याची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.
३)चंद्रशेखर राव- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रावर विश्वास ठेवणारे आहेत. चंद्रशेखर राव यांच्या कारच क्रमांक हा ६६६६ असा आहे. त्यांच्या ताफ्यात याच क्रमांकाच्या अनेक गाड्या आहेत.तर ज्योतिष आणि लक्ष्मी नारायण स्वामी मंदिराचे प्रमुख पुजारी लक्ष्मी धर्माचार्य यांच्या सांगण्यावरुन त्यांनी २०१८ साली आपला शपथविधी चार मिनिट उशिराने सुरु केला होता.
४) राजस्थान विधानसभा- राजस्थान विधानसभेतील आमदार किर्ती कुमारी आणि कल्याण सिंह यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर 2018 मध्ये भाजपच्या आमदारांनी हे विधीमंडळ स्मशानभूमीच्या जागेत बांधल्यामुळे शांती करावी अशी मागणी केली होती. पण सचिवांनी आमदारांची ही मागणी फेटाळली होती.
५)मध्य प्रदेश सरकार – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चोहान असताना २०१८ साली त्यांनी पाच साधूंना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कंम्प्यूटर बाबा, भय्यू महाराज आणि पंडित योगेंद्र महंत या साधुंना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला होता. यावरून जोरदार गदारोळ झाला होता.
गोव्याचे नेते दिगंबर कामत यांनीही देवाने आपल्याला काैल दिल्यानेच आपण भाजपात आल्याचे सांगितले होते.
तर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री नुकतेच गुवाहाटीला काम्याका देवीच्या दर्शनाला जाऊन आले. आपण बोललेला नवस पूर्ण झाल्यामुळे आपण नवस पूर्ण करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले होते.