Just another WordPress site

खाकी वर्दीची मुलीसह एवरेस्टची यशस्वी चढाई

पोलीस उपनिरीक्षक ननवरेंनी केला मुलीसह एवरेस्ट बेस कँप सर

पुणे दि २९(प्रतिनिधी)-  पोलिस ग्रामीण दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे आणि मुलगी देवयानी ननवरे यांनी जगात सर्वात उंच असलेल्या एवरेस्ट शिखरावरील चढाईचा बेस कँप पूर्ण केला त्यांच्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे नावं गिर्यारोहकांच्या यादीत झळकले आहे. त्यामूळे ननवरे पिता पुत्रिवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलिस दलात गडचिरोली येथे कर्तव्य करत असताना त्यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली ती त्यांनी पुणे ग्रामीण येथे कर्तव्य करत व्यस्त वेळापत्रकातून कायम ठेवली एवरेस्ट बेस कॅ्प सर करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमता अत्याआवश्यक असल्याचे त्यानी बोलून दाखवले हा कँप पूर्ण केल्यानंतर पत्रकराशी त्यानी गप्पा मारल्या एवरेस्ट बेस कॅम्प करताना येणाऱ्या अडचणी व अव्हणावर मात कशी करता येते, प्रतिकूल वातावरणात कोणत्या उपाय योजना कराव्या लागतात या विषयी माहिती दिली.ते म्हणाले “उणे २२ सेल्सिअस तापमान असलेल्या एवरेस्ट बेस कँप ची आव्हानात्मक चढाई करताना पायोनियर एडवेंचर कंपनीच्या साह्याने काठमांडू हून सुरुवात केली त्यानंतर लुकला या ठिकाणावर पोचलो त्यानंतर तेथून पायी चालण्यास सुरुवात केली एव्हरेस्ट बेस कॅम्प ६५ किलोमीटरचा टप्पा आहे तो पूर्ण करण्यासाठी सात दिवस लागले तापमान उणे असलेल्या चढाईत प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो तसेच योग्य ती काळजी घ्यावी लागते ,अति उत्साह जीवावर बेतू शकतो या प्रतिकूल तापमानात स्वतःच्या संरक्षणासाठी उच्च ब्रँडेड दर्जाचे कपडे अति महत्त्वाचे ठरतात सकाळी सातला ट्रेकिंग चालू केल्यावर दुपारी दोन पर्यंत चढाई करू शकतो दोन नंतर सतत हवामानत बदल होत राहतो त्यामुळे ट्रेकर्सना टी हाउस चा आधार घ्यावा लागतो उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजन कमी होतो त्यामुळे नॉर्मल चालताना देखील दमछाक होते शारीरिक मानसिक स्वास्थ्य असणारे व आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच यशस्वी होतात
ते म्हणाले की बेस कॅम्प पूर्ण करण्यासाठी रोज व्यायाम करणे सायकलिंग, स्विमिंग, रनिंग जवळपासचे परिसरातील मोठे डोंगर चढणे यावर भर दिला पाहिजे त्याच्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो असे ननवरे म्हणाले

GIF Advt

पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर साहेब यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!