..तर तो फडणवीस उपमुख्यमंत्रीही राहणार नाही
भाजपच्या राष्ट्रीय नेत्याची शिंदे फडणवीस सरकारवर अनैतिकतेची टिका
पंढरपूर दि २४(प्रतिनिधी)- पंढरपूर कॅरिडॉरवरून भाजपमध्येच राजकीय वातावरण तापले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की, कोणीही मध्ये आलं तरी तिरुपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूरचं कॉरिडॉर होणारच. पण आता भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत टिका केली आहे.
सुब्रह्मण्यम स्वामी पंढरपूर दाै-यावर होते. ते म्हणाले की, “मी आव्हान देऊन सांगतो की पंढरपूर कॅरिडॉर होणार नाही आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही, एवढी घाई कशासाठी आहे. तुम्हाला विकास करायचाच असेल तर दूषित चंद्रभागा नदी शुद्ध करा, इकडे विमानतळ बांधा, सोई सुविधा करा, इतके लोक दर्शनासाठी येतात. मंदिर परिसराचा विकास करा. या कॉरिडोरसाठी कोणाला नोटीसा पाठवणं हे चालणार नाही, असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी शिंदे फडणवीस सरकार वरही हल्लाबोल केला आहे. हे सरकार अनैतिक आहे. महाराष्ट्रात तोंडमोड करून बनवलेल हे सरकार आहे ते जास्त काळ टिकणार नाही अशी घणाघाती टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. राज्यातील सत्तातरानंतर शिंदे -फडणवीस सरकार सत्तेवर आलं असून विरोधकांकडून टीका होत असतानाच भाजपच्या माजी खासदारानेच आता सरकारवर टीका केली आहे.
मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिरांचे सरकारीकरण केले. न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार, पंतप्रधान मोदी तसे नाहीत’ असं म्हणत त्यांनी थेट मोदींवर टीका केली आहे. काही स्थानिक कॉरिडॉरच्या मुद्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची आणि पुढच्या वर्षी आषाढी यात्रेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित करण्याचा इशारा दिला आहे.