Latest Marathi News
Ganesh J GIF

होळी खेळण्याच्या बहाण्याने जपानी तरुणीसोबत अश्लील वर्तन

गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलिसांचा जपानी दुतावासाला इमेल

दिल्ली दि ११(प्रतिनिधी) – भारतात होळी खेळण्यासाठी आलेल्या जपानी तरूणी बरोबर अश्लील वर्तन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील तरूणांनी तिच्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

जपानी तरुणी होळी सणानिमित्त भारतात आली होती. दिल्लीच्या पहाडगंज परिसरात ही घटना घडली आहे.व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एका तरूणाने जपानी युवतीला घट्ट पकडून ठेवल्याचे दिसते. तिच्या गालांवर रंग लावला. बाजूलाच उभा असलेला दुसरा मुलगा तिच्या डोक्यावर जोरानं अंडी फेकतो. तर अन्य एक तरुण तिचा घट्ट पकडताना दिसतोय. तर तोच तरूण तिच्यावर स्प्रे मारताना दिसतो. ती तरुणी सोडा असे सांगत होती, तरीदेखील तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आला आहे. ही तरुणी खासकरुन होळी खेळण्यासाठी पहिल्यांदा भारतात आली होती. मात्र, या तरुणांनी तिच्यासोबत संतापजनक कृत्य केले आहे.सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी हा लैंगिक छळ असल्याचंही म्हटलं आहे. तसेच, या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेते, व सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणी पोलीसांनी जपान दुतावासाला पत्र लिहिले आहे. जपानी तरूणीची ओळख, तिचं नाव आणि इतर सगळे तपशील घेण्यात आले आहेत. तसेच तिच्याविषयी जपानी दुतावासाला आम्ही मेल केला आहे असं दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. आता काय कारवाई होणारे हे पहावे लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!