
आमदार संतोष बांगर यांची तरुणाला अश्लिल भाषेत शिवीगाळ
शिविगाळीची ऑडिओ क्लिप व्हायरल, बांगरमुळे शिंदे विरोधकांच्या निशान्यावर
हिंगोली दि १८(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा विज वितरण अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आता पुन्हा ते वादात सापडले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, या तरुणाने आमदार बांगर यांना फोन करून फायनान्स कंपनीवाले आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केली होती. मात्र आमदार बांगर यांनी या तरुणाला बोलताना आमदार बांगर हे मयत झाले आहेत त्यांना फोन करू नका असे सांगितले, ज्यामुळे त्यांच्यातील वादाला सुरूवात झाली. या तरुणाने आमदार संतोष बांगर यांना शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार बांगर हे देखील संतापले आणि त्यांनी या तरुणाला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. संतोष बांगर हे सातत्याने त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येतात. मध्यंतरी त्यांनी एकाला कानशिलात लगावल्याची बातमी समोर आलेली. त्यांचं अनेकदा या न त्या कारणास्तव सरकारी अधिकाऱ्यांसोबतही वाद होत असतो. अर्थात ही क्लिप खरी की खोटी याची पुष्टी झालेली नाही. पण बांगर आणि वाद हे समीकरण कायम आहे. या क्लिपमुळे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
शी असला गधळ, गच्च्याळ, संस्कारहीन अन जातीवरुन शिवीगाळ करणारा संविधानीक पदावर बसलेला लोकप्रतिनिधी आहे आणि आपले मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री यांची पाठ थोपटतात म्हणे?…..
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर काही करवाई करणार का? की कौतुकाने पाठ थोपटणार?😡😡😡😡😡#किळसवाणं #गलिच्छ… https://t.co/7TqGg8TUtI pic.twitter.com/h1s6dTQKhp
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) March 18, 2023
ही ऑडिओ क्लिप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पोळ पाटील यांनी ट्विटरवर पोस्ट करत आमदार बांगर यांच्यावर टीका केली आहे. तसेच या नंतर शिंदे कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान हे प्रकरण नेमकं काय होतं ते पुर्ण समजू शकलेलं नाही. त्यामुळे बांगर काय खुलासा करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.