Latest Marathi News

मेव्हण्याच्या लग्नात रोहीत शर्माने केला पत्नी रितीकासोबत भन्नाट डान्स

रितीकाबरोबर थिरकताना व्हिडिओ व्हायरल, मेव्हण्याच्या लग्नात रोहितचा देसी स्वॅग

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे खेळला नाही. कारण रोहित शर्माने आपल्या मेहुण्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. मेहुण्याच्या लग्नात हिटमॅनने पत्नी रितिकासोबत जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित शर्माने पत्नी रितिकासोबत डान्स फ्लोअरवर जोरदार डान्स केला. रोहितने काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये पंजाबी गाण्यावर डान्स केला. रोहितला अशा प्रकारे डान्स करताना त्याच्या चाहत्यांनी याआधी पाहिलेले नाही. दरम्यान हिटमॅनचा हा कूल आणि आगळ्यावेगळ्या अंदाज सर्वांना आवडला आहे. यादरम्यान या जोडप्याची अप्रतिम जुगलबंदीही पाहायला मिळाली. कुणालच्या लग्नात रोहित मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाहीये. इतकंच नाही तर मुलींच्या गँगच्या फोटो शूट दरम्यान त्याने खास एन्ट्री केली होती, ज्याचा फोटो रितिकाने शेअर केला होता. रितिका तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रत्येक क्षणाचे फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये रोहित पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये दिसत होता. त्याच्या गाण्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांनी क्रिकेटच्या अंदाजात त्याचे काैतुक केले आहे. काही युजर्सने म्हटले आहे की ‘रोहितने इथेही त्याचे फुटवर्क किती चांगले आहेत, हे दाखवले.’ तसेच काहींनी म्हटले आहे की त्याचे सर्वोत्तम मुव्हज तो दाखवत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित शर्मा खेळला नसल्याने मालिकेसाठी उपकर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याने नेतृत्वाची जबाबदारी पार पडली.तरी तो दुसऱ्या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सामना १९ मार्चला विशाखापट्टणमला आणि २२ मार्चला तिसरा सामना चेन्नई येथे होणार आहे. या दोन्ही सामन्यात रोहित भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!