सावधान! काळजी घ्या कारण तो पुन्हा येतोय
पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता
दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- देशातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने पसरताना दिसत आहेत. देशातील कोरोना रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. देशात एका दिवसात हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ही मागील ४ महिन्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे आता मोदींनी बैठक बोलवली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीचे बैठक बोलावली आहे. यात कोरोनाबाबत परिस्थिती हातळण्यासाठी तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.भारतात सध्या कोरोनाच्या XBB 1.16 प्रकारातील सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याचा प्रभाव वाढू नये यासाठी सरकारने पावले उचलायला सुरूवात केली आहे. सरकार यावेळी मास्कबाबतही निर्णय घेण्याची शक्यता आहे.आज देशभरात ११३४ नवे कोरोना रुग्ण आढळले. सध्या देशात ७ हजार ०२६ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. मागील २४ तासांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय केरळमध्ये एका कोरोनाबाधित व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात खासदार अभिनेत्री किरण खेर यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्या अधिवेशन सुरु असल्याने संपर्कात आलेल्यांना त्यांनी टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले आहे. बैठकीत सरकार महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यात देश आत्तापर्यंत यशस्वी ठरला आहे. भारतात आतापर्यंत कोरोना लसीचे २२०.६४. कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. यामध्ये १०२.७३. कोटींपेक्षा जास्त लोकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. तर यातील ९५.१९ कोटी पेक्षा जास्त लोकांनी दुसरा डोसही घेतला आहे.