Latest Marathi News
Ganesh J GIF

नगर जिल्ह्यात भर रस्त्यात काढली अल्पवयीन मुलीची छेड

छेड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल, आरोपीला अटक, राज्यात महिला असुरक्षित

अ.नगर दि ३ (प्रतिनिधी) – राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आले आहे. दर्शना पवार हत्याकांड, पुण्यात मुलीवर झालेला कोयता हल्ला यामुळे सर्व स्तरातून टिका झाली होती. पण तरीही मुलींवरील अत्याचार चालूच आहेत. आता अहमदनगरमध्ये एका मुलीचा भररस्त्यात विनयभंग करण्यात आला आहे.

नगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरमध्ये भरदिवसा अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे. छेड काढण्यात आलेली मुलगी अल्पवयीन आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान बसस्थानकाजवळच आरोपीने दोन बहिणींची छेडछाड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रफिक उर्फ लाल्या मुनीर पठाण याला ताब्यात घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आरोपीवर कारवाई करणयाचे अवाहन पोलिसांना केले आहे. त्या म्हणाल्या की, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहर मध्ये भर रस्त्यात मुलींची छेडछाड केली जात असल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. भरदिवसा रस्त्यात मुलींना असा त्रास देण्याचा प्रकार गंभीर आणि मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या व्हिडीओची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिस अधीक्षक, अहमदनगर यांना तातडीने चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. पण महिला सुरक्षेचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!