
मुलासाठी पाच मुलींची भर रस्त्यात जोरदार हाणामारी
हाणामारीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल, एकमेकींच्या झिंज्या धरत फ्री स्टाईल मारामारी
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मुलीसांठी मुलांमध्ये होणारे वाद आपण खुप वेळा पाहिले असतील. पण अलीकडे मुलीही मागे राहिलेल्या नाहीत. कारण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका मुलासाठी चक्क मुलींमध्ये भररस्त्यात जोरदार हाणामारी झाली आहे.
सोशल मिडीयावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्यात एक दोन नाहीतर पाच मुली एका मुलीसाठी भांडण करत आहेत. विद्यार्थीनी झिंज्या उपटून एकमेकिंना मारहाण करताना दिसत आहेत. या मुलींसोबत काही विद्यार्थीही अश्लील भाषेत शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. कोणतीही भाड भीड न ठेवता हाणामारी करत आहेत. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. दरम्यान मुलींच्या हाणामारीचे व्हिडिओ अलीकडे चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर मधील व्हिडिओ काही दिवसांपुर्वी चांगलेच व्हायरल झाले होते. लोकलमधील महिलांची हाणामारी नित्याचीच आहे.
https://twitter.com/gharkekaleshh/status/1675771950730448896?t=vxMY33dP9pYjX3g-rRqLJg&s=19
‘घर के कलश’ नावाच्या ट्वीटर हॅंडलवर मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एका मुलासाठी या मुलींमध्ये जोरदार राडा झाल्याचं कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. पोलीसांनी या मुलीवर कारवाई केल्याची माहिती आहे.