Latest Marathi News
Ganesh J GIF

सोशल मिडीया स्टारने पोलीसांच्या गाडीत बनवला अश्लील व्हिडिओ

रिल्स व्हायरल झाल्यानंतर पोलीसच गोत्यात, त्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन, रिल्स स्टारवरही होणार कारवाई

जालंधर दि २८(प्रतिनिधी)- मागील अनेक दिवसापासून रिल्स बनवणा-या तरुणाईची संख्या वाढत आहेत. पण त्याचबरोबर नियमांना हरताळ फासला जात आहे. तसेच अश्लील व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. असाच काहीसा प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. त्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.

पंजाबमधील जालंधर शहरात हा प्रकार घडला आहे. यात एका तरूणीने पोलिसांच्या गाडीत बसून रील शूट केले. या रीलमध्ये तिने अश्लिल आणि विचित्र हावभाव केले. तसेच, ती गाडीच्या बोनेटवरही बसली होती. धक्कादायक म्हणजे, पोलीस अधिकाऱ्यानेच तिला पोलीस वाहनाचा वापर करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुणी पोलीसांच्या गाडीवरील बोनेटवर बसून पंजाब शेरनी गाण्यावर डान्स करत आहे. तसेच तिने गाडीतही अश्लील हावभाव असणारे रिल्स बनवले होते. विशेष म्हणजे हा व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकल्गावरही पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पण जालंधरचे पोलीस आयुक्त कुलदीप चहल यांनी अशोक शर्मा या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. सोशल मीडियासाठी रिल्स बनवण्याकरता मुलीला पोलिसांच्या अधिकृत वाहनाचा वापर करू दिल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सोशल मीडिया स्टार म्हटली जाणारी ही मुलगी तिच्या आधीच्या रिल्समुळे देखील वादात सापडली होती. या मुलीने शूटिंग करतानाचा व्हिडीओ बनवला होता. त्यावेळीही पोलीसांनी तरुणीवर कोणतीही कारवाई केली नव्हती. असाच प्रकार पंजाबमध्ये घडला होता. यात एका इन्फ्लुअन्सरने थारवर बसून राष्ट्रीय महामार्गावर रिल्स बनवले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!