Just another WordPress site

चोराने चालत्या मालगाडीतुन केली तेलाची चोरी

तेल चोरीचा व्हिडीओ व्हायरल, चोरीचा थरार पाहुन शाॅक व्हाल

बिहार दि ६(प्रतिनिधी)- चोरी करण्यासाठी चोर काय करू शकतात याची कल्पनाही करू शकत नाही. सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये बिहारमधील चोर चालत्या मालगाडीतून तेल चोरताना पकडले गेले आहेत. यात थोडीशी चूक झाली तर चोराला आपले प्राण गमावावे लागले असते तरीही तो हे धाडस करताना दिसत आहेत.

बिहारमधील चोरांनी पाटणाच्या प्रशासकीय उपविभाग बिहटा येथून जाणाऱ्या तेल टँकर ट्रेनला टार्गेट केले आहे.बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील बिहता नगरचा भागात चोर धावत्या ट्रेनमधुन तेल चोरत आहे. बादलीत तेल भरत असताना एक रेल्वे ब्रिजही आहे, जिथे चोरटे जीवाची पर्वा न करता धावत आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तेल डेपोकडे जाणाऱ्या मालगाडीतून चोरांनी तेल चोरण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिकांनी तेलाचे टँकर घेऊन जाणाऱ्या मालगाडीवर हल्ला केला आणि नंतर त्यांच्या बादल्यांमध्ये तेल भरण्यासाठी धावताना दिसले.आतापर्यंत या कृत्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक यावर वेगवेगळ्या कंमेंट करताना दिसत आहेत.

GIF Advt

बिहारमधील चोऱ्या खूप लोकप्रिय झाल्या आहेत. हा व्हिडीओ @KhatoonShamsida नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. चोरीची ही पद्धत पाहुन कोणीही डोक्याला हात मारून घेईल पण हे चोर मात्र सफाईदारपणे चोरी करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!