
गप्पा मारणाऱ्या बहिणींच्या सोन्यावर चोरट्याचा डल्ला
दिवसाढवळ्या चोराचा सुळसुळाट, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांचा चोराला चोप
रायगड दि १९(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस चोरीच्या घटनात वाढ होत आहे. आता तर लग्न सराईचा काळ असल्याने तर त्यात जास्तच वाढ झाली आहे. चोरटे वृद्धांना जास्त टार्गेट केले जात आहे. अशीच एक घटना रायगडमधून समोर आली आहे. रायगडमध्ये एका आजीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की फिर्यादी सुषमा मेहता ही तिच्या बहिणीकडे पुष्पलता दोशी व चुलत वडील मंगल शेठ यांना भेटण्याकरिता आल्या होत्या. याच वेळी बँकेच्या बिल्डिंगमधील पायऱ्या चढताना या आजी थकल्या. त्यामुळे त्या पायऱ्यांवरच गप्पा मारत उभ्या राहिल्या. तेवढ्यात पाठीमागून आलेला एक अज्ञात चोरटा हा जीना चढून पुढे जाऊन पुन्हा पाच सहा पायऱ्या खाली उतरला आणि फिर्यादी सुषमा मेहता हिच्या गळ्यात असलेली सोन्याची साखळी किंमत रुपये एक लाख साठ हजार गळ्यातील चैन खेचून पोबारा केला परंतु सुषमा मेहता हिच्या ओरडण्याने तेथील असणाऱ्या नागरिकांनी चोराचा पाठलाग करून पकडला व चांगलाच चोप दिला आहे. ही संपूर्ण घटना बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
चोराला पोलिसानी ताब्यात घेतले असून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर आघाव व पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.