Latest Marathi News
Ganesh J GIF

लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला

सातारा : आजकाल कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये आपल्या लेकीला भेटायला जात असताना पुणे – बंगळुरू आशियाई महामार्गावर  खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अपघातग्रस्त एस आकाराच्या धोकादायक वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सिंधुबाई जनार्दन गुरव (वय ६२ , रा. जोशी विहीर, ता. वाई लोकरेची अनवाडी )  या जागीच ठार झाल्या तर दुचाकीचालक जनार्दन जगन्नाथ गुरव हे किरकोळ जखमी झाले.

काय घडले नेमके?

या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशीविहीरहून (ता. वाई ) सारोळा (ता. भोर) येथे आपल्या लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून (क्रमांक एमएच ११  सीवाय ७८०४ ) निघालेले गुरव दांपत्यांना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने (क्रमांक एमएच १४ जीयू ३१३० ) जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या सिंधुबाई गुरव यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या, तर पती जनार्दन गुरव हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे व पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे यांच्यासह वाहतूक पोलीस गणेश सणस, जाधव, पोळ, महागंडे, धायगुडे व अमित चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. प्रभाकर गणपत किनगे (रा. मालेगाव कल्याणी, ता. निलंगा, जि. लातूर ) या मालट्रक चालकास पोलिसांनी अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!