भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
या तारखेला भारत पाकिस्तान संघ या मैदानावर भिडणार, पहा भारताचे पूर्ण वेळापत्रक
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- एकदिवसीय विश्वचषक २०२३ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी मैदानांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर सामन्याचे वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आले आहे.
विश्वचषकातील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल. या मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. टीम इंडियाचे ९ सामने ९ वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. वर्ल्डकपमधील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्धचे सामने ५ ठिकाणी होणार आहेत. या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत असून त्यापैकी आठ संघ निश्चित आहेत आणि दोन पात्रता फेरीतून येतील. ही स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि त्याचे वेळापत्रक अजून जाहीर व्हायचे आहे, तर गेल्या दोन विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक एक वर्ष अगोदर ठरवले गेले होते. २०१३ नंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. टीम इंडियाला ४ वेळा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर २०१४ पासून ४ वेळा भारताला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर कसोटी विजेतेपद स्पर्धेत अंतिम सामन्यात भारत पराभूत झाला आहे.
भारतीय संघाचे संभाव्य वेळापत्रक
भारत-ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर (चेन्नई)
भारत-अफगाणिस्तान- ११ऑक्टोबर (दिल्ली)
भारत-पाकिस्तान- १५ ऑक्टोबर (अहमदाबाद)
भारत-बांगलादेश- १९ ऑक्टोबर (पुणे)
भारत-न्यूझीलंड-२२ ऑक्टोबर (धर्मशाला)
भारत-इंग्लंड- २९ ऑक्टोबर (लखनौ)
भारत-क्वालिफायर संघ- २ नोव्हेंबर (मुंबई)
भारत-दक्षिण आफ्रिका- ५ नोव्हेंबर (कोलकाता)
भारत-क्वालिफायर संघ- ११ नोव्बेंबर (बंगळुरू)