Latest Marathi News
Ganesh J GIF

ही अभिनेत्री झेड सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार

धमकीचा इमेल आल्याने अभिनेत्री भयभीत, तुलना करत म्हणाली,'कंगनाला भेटली मग...

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी काॅन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचे ईमेल आल्याने तिने थेट मोदींकडे झेड सिक्युरिटीची मागणी केली आहे.

राखी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षेसाठी भेट घेणार आहे. एका वृ्तवाहिनीशी संवाद साधताना ती म्हणाली की, “मी लवकरच मोदीजी यांची भेट घेणार आहे. खरंतर मी हे इतक्यात कोणालाच सांगणार नव्हते. मी झेड (z) सिक्युरिटीसाठी मोदीजी यांच्याकडे मागणी करणार आहे. जर ते ही सुरक्षाव्यवस्था कंगना रनौतला देऊ शकतात, तर मग मला का नाही देऊ शकत? कंगनाला तर कसलीही धमकी मिळाली नव्हती, माझ्याकडे तर धमक्यांचे मेल आहेत.” असा दावा तिने केला आहे. राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वीच दावा केला होता की, तिला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल आला होता. सलमान खानला आम्ही बॉम्बेमध्ये मारून टाकू, त्यात इन्वॉल्व हाेवू नका, अन्यथा तुम्हाला अडचणीत येणार, असे मेलमध्ये म्हटले होते. राखी सावंतने स्वत:साठी झेड सुरक्षेची मागणी केल्याचे समजताच चाहत्यांना हसू आले. राखीच्या समोर आलेल्या व्हिडीओची त्यांनी बरीच खिल्ली उडवली जात आहे त्याचबरोबर तिला ट्रोल देखील करण्यात येत आहे.


त्याचबरोबर राखीने लॉरेन्स बिश्नोईला थेट आव्हान दिले आहे. राखी म्हणाली. माझ्या भावाला हात लावू नका. भावाच्या बहिणीच्या हत्येने तुमचं पोट भरत असेल, तुम्हाला शांती मिळेल तर माझा जीव घ्या .. नक्कीच मी सलमान खानची बहीण राखी सावंत आहे. माझा हत्येचा गुन्हाही तुमच्या डोक्यावर येणार नाही. जा..अल्लाह-हू-अकबर.’ असे आव्हानच तिने दिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!