Just another WordPress site

आदित्य ठाकरेंचा जागतिक डंका, यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समावेश

सर्वाधिक आश्वासक युवा नेत्याचा बहुमान, जगभरातून कौतुकाचा वर्षाव बघा यादी

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास -२०२३ च्या नव्या यादीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह ६ भारतीयांचा समावेश आहे. आदित्य ठाकरे यांच्या नावाचा पब्लिक फिगर गटात समावेश करण्यात आला आहे. याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

GIF Advt

महाराष्ट्रातील आश्वासक युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी जागतिक स्तरावर झेप घेतली आहे. जे आपल्या समाजासह देशात व जगामध्ये सकारात्मक आणि चिरस्थायी बदलांसाठी सातत्याने काम करत असतात. तसेच राजकीय नेते, संशोधक, उद्योजक व दूरदर्शी कार्यकर्ते यांचा यामध्ये समावेश करण्यात येत असतो.दरम्यान, आदित्य ठाकरेंसह यंग ग्लोबल लीडर्स क्लास -२०२३ यादीत वेगवेगळ्या गटांमध्ये ६ भारतीयांचा समावेश आहे. यासह भाजप युवा विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांचा समावेश आहे, तर टीव्हीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, बायझीनचे कार्यकारी संचालक विबिन जोसेफ, उद्योग गटात जियो हॅप्टिक टेक्नॉलॉजीच्या आकृती वैश, आणि थिंक टँक गटात तन्वी रत्ना यांचा समावेश आहे. यात ४० वर्षांखालील तरुणांना एकमेकांकडून प्रेरणा घेता यावी आणि एकमेकांना विविध आव्हाने देता यावीत याकरिता यंग ग्लोबल लीडर्सचे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून तरुणांनी केलेल्या नव्या कल्पनांचा जागतिक स्तरावर प्रचार होऊ शकेल. हा या मागचा उद्देश आहे. यंग ग्लोबल अवॉर्डची स्थापना २००४ मध्ये झाली व तेव्हापासून अत्यंत महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी जगामधून उत्कृष्ट व्यक्तींचा एक समूह तयार केला जातो. जगभरातील १२० देशातून १४०० सदस्य व माजी विद्यार्थी यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान पब्लिक फिगर मध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव आल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने यंग ग्लोबल लीडर्स क्लास -२०२३ च्या नव्या यादीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे व सहा भारतीयांचा समावेश आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, आम्हाला याचा आनंद आहे, आम्ही खूष आहोत.आदित्य ठाकरेंनी मागील काही दिवसात विविध क्षेत्रात चांगले काम केले आहे. ते या राज्याचे देशाचे भविष्य असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!