Latest Marathi News
Ganesh J GIF

तरुणांची वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण

सिग्नल तोडणाऱ्या तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, रक्षणकर्तेच असुरक्षित

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- मुंबईतील कुर्ला या ठिकाणी, दोन बाईक चालकांनी दंड आकारणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना मारहणा केली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

मुंबईत दोन बाईक चालकांनी ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन केले होते. त्यांच्याकडे हेल्मेट सुद्धा नव्हते. त्यामुळे ट्राफिक पोलिसांनी त्यांना नियमाचा भंग केल्याने थांबवत दंड आकारण्याचा प्रयत्न केला. पण ते तरुण पोलिसांना जुमानत नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसानी ई-चालान डिव्हाईजच्या मदतीने तरुणांच्या या बाईकच्या नंबर प्लेटचे फोटो काढले. ही बाब त्या बाईक चालकांना न आवडल्याने थेट पोलिसांवर हात उचलला आणि ट्राफिक पोलिसांना मारहाण केली. मारहाण करत असताना दुसरा पोलीस कर्मचारी मध्यस्थी करून हे भांडण सोडवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.या आरोपींवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.  हा व्हिडीओ @Rajmajiofficial या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकासाठी बंधनकारक आहे. मात्र बरेचजण हे नियम मोडताना दिसतात. आता या पोलीसावरच हल्ला करणाऱ्या तरुणांवर काय कारवाई होणार हे पहावे लागेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!