Just another WordPress site

पुण्यानंतर आता या शहरात कोयता गँगची दहशत

कोयता नाचवत दहशत निर्माण करण्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलीसांसमोर आव्हान

अहमदनगर दि ६(प्रतिनिधी)- कोयता गँगच्या दहशतीचे लोण पुणे शहरानंतर इतर ठिकाणीही पाहायला मिळत आहे. कारण आता अहमदनगरमध्येही कोयता गँगची दहशत पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कोयता गँगची दहशत दिसत आहे.

अहमदनगर- पुणे महामार्गावर असणाऱ्या सुपा या गावात किरकोळ कारणातून एका पान शॉप चालकास एका टोळक्याने कोयत्याने आणि लाकडी दंडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पान शॉप चालक समीर जब्बार सय्यद आणि साजीद शेख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कोयता गँगमधील मुख्य आरोपी कैफ मन्यार याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला रांजणगाव गणपती येथून अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अहमदनगर शहरात पुन्हा एकदा कोयता गँगचा उदय झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

GIF Advt

कोयता गँगने पुण्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. शहरातील उपनगरांमध्ये त्यांनी दहशत माजवलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पुणे पोलीसांनी यावेळी काहींना अटक करत त्यांची धिंडही काढण्यात आली होती. पण कोयता गँगची दहशत कायम आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!