Latest Marathi News
Ganesh J GIF

टिळकांनंतर आता बापटांचा नंबर का?, भाजपाची बॅनरबाजी

टिळक घरातील उमेदवारी न दिल्याने ब्राम्हण समाज नाराज, भाजपाला फटका बसणार?

पुणे दि ६(प्रतिनिधी)- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण टिळकांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने घराबाहेरील उमेदवार दिल्याने भाजपाविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

कसबा मतदारसंघातील भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी कसबा परिसरात बॅनरबाजी केली आहे. ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले आहेत. या बॅनरवर कोणाचेही नाव नसून कसब्यातील एक जागरूक मतदार इतकेच लिहलेले आहे. टिळक घरातील उमेदवार न दिल्याने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी देखील याबात नाराजी व्यक्त केली होती. तर कुणाल टिळक यांची पक्षाने प्रवक्तेपदावर बोळवण केली आहे. त्यावेळेच टिळकांना उमेदवारी मिळणार नाही याची कुणकुण लागली होती.भाजपाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी दिली होती. तर आता कसबा पोटनिवडणुकीत टिळकांचे तिकीट कपात रासनेंना उमेदवारी दिल्याने ब्राम्हण समाज भाजपवर नाराज आहे. महाविकास आघाडी रवींद्र धंगेकर यांच्यासारखा तगडा उमेदवार दिल्याने तुल्यबल लढतीची शक्यता आहे. अशावेळी फक्त सहानुभूतीचा फायदा होणार नसल्याने जनतेशी संपर्क असलेल्या हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.


ब्राम्हण महासंघाने देखील भाजपावर टिका केली आहे. एकीकडे जगताप कुटुंबाला न्याय आणि टिळक कुटुंबावर अन्याय आधी मेधा ताई, नंतर देवेंद्रजी आणि आत्ता टिळक कुटुंबीयांना संधी नाकारणा-या भाजपला फक्त जातींची मते हवी आहेत. त्या जाती नकोच असतात,पण सर्वच जातींना योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असे आनंद दवे म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!