Latest Marathi News
Ganesh J GIF

रश्मिकानंतर ही अभिनेत्री ठरली डीपफेक व्हिडीओची शिकार

अभिनेत्रीचा चेहरा लावत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, अनेक अभिनेत्री ठरत आहेत बळी, विचित्र प्रकारामुळे भीतीचे वातावरण

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक फेक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यावेळी यावर बरीच चर्चा झाली होती. ती चर्चा संपत होत नाही तोच आणखी एका अभिनेत्रीचा एक फेक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. रश्मिकानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री काजोलही याची शिकार झाली आहे. होय, काजोलचा एक अश्लील व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काजोलचा अश्लिल व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात काजोल कॅमेरासमोर कपडे बदलताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काजोलच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ‘काजोल देवगण कॅमेऱ्यात कपडे बदलताना कैद झाली’ असे लिहिलं आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार ती काजोल नसून सोशल मीडियावरील प्रसिद्ध इंफ्लुएंजर आहे. जिने खूप आधी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला होता, जो खूप व्हायरल झाला होता. मूळ व्हिडिओ ५ जून २०२३ रोजी अपलोड करण्यात आला होता.  या व्हिडिओवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही अनेक जण करत आहेत. आता यावर अभिनेत्री काजोलने प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरीही ती काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काजोलआधी अभिनेत्री कतरीना कैफचेही काही डिपफेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये अभिनेत्री टॉवेल गुंडाळून अँक्शन सीन करताना दिसत होती. तिचा हा फोटो अत्यंत चुकीच्या पद्धतीने मॉर्फ करण्यात आला होता. तर सुरुवातीला रश्मिकाचा डिपफेक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. रश्मिका, कतरिनानंतर आता काजोलसोबतही तोच प्रकार घडल्यानं चाहत्यांनी चिंता आणि संताप व्यक्त केला आहे. रश्मिका मंदान्ना प्रकरणात दिल्ली पोलिसांनी १० नोव्हेंबरला तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. यानंतर पोलीसांनी एक तरूणाला अटक केली होती. दरम्यान काजोलच्या या व्हायरल व्हिडीओमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

डीपफेक तंत्रज्ञान म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चेहरा हटवून त्या जागी दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा लावणे. यामध्ये बनावट कॉन्टेंटमध्ये भरपूर डेटा एडिट करून खोट्या फोटोला खरे केले जाते. रश्मिकाच्या डीपफेक प्रकरणात सर्वात आधी अमिताभ बच्चन यांनी आवाज उठवला. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली. केवळ भारतातच नाही तर हॉलिवूडमध्येही अनेकजण याचे शिकार झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!