निर्णयानंतर आत्तापर्यंत दोन हजाराच्या एवढ्या नोटा बँकेत जमा?
रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी जाहीर, तब्बल एवढ्या कोटींच्या नोटा जमा, आरबीआय नवी नियमावली
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मेला दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बँकांमध्ये दोन हजार नोटा जमा करण्यात येत आहे. बँकांमध्ये २३ मे पासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आता आरबीआयने आत्तापर्यंत किती नोटा जमा झाल्या याची माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार मागील १६ दिवसात २००० रुपयांच्या नोटांमध्ये आतापर्यंत १.८० लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. एकुण नोटांच्या ८५ टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या असल्याची माहिती गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी दोन हजाराची नोट चलनात आली होती. पण आता क्लिन पाॅलीसी अंतर्गत ही दोन हजाराची नोट देखील बंद करण्यात आली आहे. दरम्यान २०१६-१७ या आर्थिक वर्षात दोन हजाराच्या ३५४२९.९१ कोटी नोटा छापल्या होत्या. तर २०१७-१८ साली १११५.०७ कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०१८-१९ साली ४६६.९० कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. त्यानंतर मात्र दोन हजाराची एकही नोट छापण्यात नाही नाही.
दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर आरबीआयकडे चलनाचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नोटा आरामात जमा करा किंवा बदलून घ्या, कोणीही शेवटच्या दिवसाची प्रतिक्षा करू नये, असे आवाहन बँकेने केले आहे.