Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपाकडुन महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांवरील संभाव्य उमेदवारांची घोषणा?

लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख जाहीर, नेत्यावर लोकसभेची जबाबदारी, बघा संभाव्य उमेदवार?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भाजपाने आगामी लोकसभेसाठी मिशन ४५ ची घोषणा दिली आहे.त्याच्याच तयारीचा एक भाग म्हणून भाजपाचे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निवडणुक प्रमुखांची नेमणूक केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रमुखांची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपाने एकप्रकारे निवडणूकीचे बिगुल फुंकले आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून यावे म्हणून या निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचा निर्णय झाला आहे. पण भाजपाने यावेळी शिंदे गटातील खासदारांच्याही मतदारसंघात निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आगामी काळात जागावाटपाच्या चर्चेवेळी दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.भाजप यंदा मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असून अनेक विद्यमान आमदारांना यंदा शोकसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघात आमदार राहुल कुल यांच्याकडे तर शिरुर लोकसभा मतदारंसघाची जबाबदारी भाजप आमदार महेश लांडगे यांच्याकडे दिली आहे. भाजपाचे बारामती मतदारसंघावर विशेष लक्ष असुन २०१९ च्या लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांचे पती आमदार राहुल कुल यांच्याकडे बारामतीची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपाचे निवडणूक प्रमुख

मुंबई उत्तर – योगेश सागर
मुंबई उत्तर पश्चिम – अमित साटम
मुंबई उत्तर पूर्व – भालचंद्र शिरसाट
मुंबई उत्तर मध्य – पराग अळवणी
मुंबई दक्षिण मध्य – प्रसाद लाड
मुंबई दक्षिण – मंगलप्रभात लोढा
ठाणे – विनय सहस्रबुद्धे
मावळ – प्रशांत ठाकूर
रत्नागिरी- सिंधुदुर्ग – प्रमोद जठार
कोल्हापूर – धनंजय महाडिक
हातकणंगले – सत्यजीत देशमुख
सांगली – दीपक शिंदे
सातारा – अतुल भोसले
सोलापूर – विक्रम देशमुख
माढा- प्रशांत परिचारक
जालना – विजय औताडे
लातूर – दिलीप देशमुख
छत्रपती संभाजीनगर – समीर राजूरकर
दिंडोरी – बाळासाहेब सानप
वर्धा – सुमीत वानखेडे
पुणे – मुरलीधर मोहोळ
बारामती – राहुल कुल
शिरुर – महेश लांडगे

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!