अजित पवारांच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली?
अजित पवार 'या' तारखेला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, एकनाथ शिंदेना ही जबाबदारी देण्यात येणार?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्याचे राजकारण झपाट्याने कलाटण्या घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु होती. पण आता आणखी एक दावा नव्याने करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवीन दावा करत खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या १० ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री होतील, असा अंदाज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हा खुलासा केला आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार असा दावा ते सत्तेत सामील झालेल्या दिवसापासून करण्यात येत आहे. तसे अंदाज संजय राऊत, खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले होते. तसेच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा निवासस्थानाजवळ अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदारीचे बॅनर झळकले होते. तर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असा आशावाद व्यक्त केला होता. त्यातच शिंदे गटाचा विरोध मोडत अजित पवार अर्थमंत्री झाल्याने या चर्चेला अधिक जोर आला होता. या सर्व बाबींवर बोलताना चव्हाण म्हणाले की, “मी माझ्याकडे असणाऱ्या माहितीच्या आधारावर एक राजकीय विश्लेषक म्हणून हे वक्तव्य केलेलं होतं. याबाबत माझं आकलन आजही असं आहे की, अतिशय महत्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीला समोर ठेवून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी एक निर्णय केलेला आहे. “ज्यानुसार त्यांना असं वाटत की सध्या मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे काही महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचा प्रभाव पाडू शकलेले नाहीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला लोकसभा निवडणुकांना सामोरं जाता येणार नाही. त्यामुळे आता अजित पवारांना भाजपने सोबत घेतलेलंच आहे तर त्यांना आता ती जबाबदारी द्यावी. नार्वेकर अपात्रतेचा निर्णय घेतील त्यानंतर हा बदल होईल. अजित पवारांना एकनाथ शिंदेंच्या जागी मुख्यमंत्री केलं जाईल. कारण महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची भाजपला गरज आहे. असा दावा चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा आणखी काही दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली होती. ही भेट फेअरवेल असल्याची चर्चा रंगली होती. अजित पवार यांना मुख्यमंत्री करुन एकनाथ शिंदे यांना एखादी सन्मानजनक जबाबदारी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासूनच ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.