Latest Marathi News
Ganesh J GIF

महाविकास आघाडीचे लोकसभेचे जागावाटप निश्चित, मतदारसंघही ठरले?

कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात लढणार यादी व्हायरल, पहा कोणत्या पक्षाला किती जागा, महायुतीत संभम्र?

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. कारण महाविकास आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे मतदारसंघ देखील निश्चित झाल्याची चर्चा आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षामध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहे. पण काही वृत्तवाहिन्यांमध्ये मतदारसंघ देखील निश्चित झाले असल्याचा दावा केला आहे. तशी यादी देखील व्हायरल झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाला १९ ते २१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १३ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच शरद पवार गटाला १० ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात TV 9 मराठीनेच तर मतदारसंघ देखील निश्चित झाल्याचा दावा केला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा विभागानुसार जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा २३ शिवसेना १८ राष्ट्रवादी ४ तर काँग्रेसला १ जागा मिळाली होती. तर दोन जागांवर इतर पक्षांनी बाजी मारली होती. पण नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल झाल्याने पक्षीय बलाबल बदलले आहेत. सध्या महाविकास आघाडीकडे ९ खासदार आहेत. तर महायुतीकडे ३७ खासदार आहेत. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणूकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता असणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. ४६ जागांची बोलणी जवळपास पुर्ण झालेली आहे. तसेच मात्र दोन जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. दरम्यान अकोला , हातकणंगले जागा महाविकास आघाडीने राखीव ठेवली आहे. राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. वंचित बहुजन आघाडी मविआसोबत आली तर अकोला जागा वंचितला दिली जाऊ शकते. अन्यथा ही जागा काँग्रेसला दिली जाणार आहे.

संभाव्य जागा वाटप
दक्षिण मुंबई : शिवसेना (ठाकरे गट)
दक्षिण मध्य : शिवसेना (ठाकरे गट)
ईशान्य मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) उत्तर पश्चिम मुंबई : शिवसेना (ठाकरे गट)
उत्तर मध्य मुंबई : काँग्रेस,
उत्तर मुंबई : काँग्रेस
रत्नागिरी सिंधुदुर्ग : शिवसेना (ठाकरे गट)
रायगड : शिवसेना (ठाकरे गट)
कल्याण : शिवसेना (ठाकरे गट)
पालघर : शिवसेना (ठाकरे गट)
ठाणे : शिवसेना (ठाकरे गट)
भिवंडी : राष्ट्रवादी (पवार गट)
नागपूर : काँग्रेस
वर्धा : काँग्रेस
चंद्रपूर : काँग्रेस
गडचिरोली : काँग्रेस
भंडारा गोंदिया : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (पवार गट)
अमरावती : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (पवार गट)
यवतमाळ-वाशिम : शिवसेना (ठाकरे गट)
बुलढाणा : शिवसेना (ठाकरे गट) रामटेक : शिवसेना (ठाकरे गट) अकोला : वंचित बहुजन आघाडी अन्यथा काँग्रेस
नांदेड : काँग्रेस
लातूर : काँग्रेस
धाराशिव : शिवसेना (ठाकरे गट)
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (ठाकरे गट)
परभणी : शिवसेना (ठाकरे गट)
बीड : राष्ट्रवादी (पवार गट)
हिंगोली : राष्ट्रवादी (पवार गट) किंवा शिवसेना (ठाकरे गट)
जालना : राष्ट्रवादी (पवार गट) किंवा शिवसेना (ठाकरे गट)
धुळे : काँग्रेस
नंदुरबार : काँग्रेस
जळगाव : राष्ट्रवादी (पवार गट)
रावेर : राष्ट्रवादी (पवार गट)
दिंडोरी : राष्ट्रवादी (पवार गट)
नगर : राष्ट्रवादी (पवार गट) नाशिक : शिवसेना (ठाकरे गट) शिर्डी : शिवसेना (ठाकरे गट)
पुणे : काँग्रेस,
सोलापूर : काँग्रेस,
बारामती : राष्ट्रवादी (पवार गट),
माढा : राष्ट्रवादी (पवार गट),
सातारा : राष्ट्रवादी (पवार गट), शिरूर : राष्ट्रवादी (पवार गट),
कोल्हापूर : शिवसेना (ठाकरे गट),
मावळ : शिवसेना (ठाकरे गट),
सांगली : काँग्रेस किंवा राष्ट्रवादी (पवार गट),
हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटना अन्यथा राष्ट्रवादी (पवार गट)

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!