Just another WordPress site

गजाननची तिसरी पत्नी कवितासोबत असे काही घडले की..

वर्षभरापुर्वीच झाले होते लग्न, वर्षाच्या शेवटच्या दिवशी घडले धक्कादायक

जालना दि २(प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका आरोपी नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे खून केलेली महिला आरोपीची तिसरी पत्नी होती.

GIF Advt

कविता गजानन आव्हाड असे या मृत महिलेचे नाव आहे. तर गजानन रघुनाथ आढाव असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलीसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार कविताचा गजानन बरोबर वर्षभरापुर्वी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर त्यांच्यात कडाक्याची भांडणे सुरू झाली. औरंगाबादमध्ये घर घेण्यासठी ५ लाख रुपये आण, असा मानसिक आणि शारिरीक छळ सासरकडच्यांनी केला. यामुळए कंटाळून कविताने २० दिवसांपूर्वी हर्सूल येथील पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, मात्र त्यानंतर नातेवाईकांनी समजुत घालून त्यांना परत एकत्र केले. घटनेच्या दिवशी गजाननने कवितालस आपल्याला बेलोरा येथील नातेवाईकांकडे जायचे आहे असे सांगून दुचाकीवर बसविले व रात्रीच्या दरम्यान टॅक्टरचा अपघात घडवून आणला. यामध्ये कविता जागीच ठार झाली, मात्र गजाननला मार लागला नाही. त्यामुळे नातेवाईकांना संशय आल्याने कविता हिच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपी गजानन याच्याविरोधात हसनाबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तर सासू कोशल्याबाई आढाव, नणंद अरुणा नारायण जाधव, ताराबाई फारकडे, मीरा चव्हाण शीला कोंडके तेजस फरकाडे यांच्यावर घर खरेदीसाठी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून कविताचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी पती व टँकर चालकाविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गजानन आढाव याला अटक करण्यात आली आहे दरम्यान भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर दीपक सोनी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मयत कविता हिच्यावर तिच्या माहेरी लिहाखेडी तालुका सिल्लोड अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!