Latest Marathi News

मंत्रीपद न मिळाल्याने माझ्याच पक्षातील नेत्यांचा माझ्याविरोधात कट

मंत्री अब्दुल सत्तारांचा खळबळजनक गौप्यस्फोट, नेत्याचे नाव गुलदस्त्यात

ओैरंगाबाद दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे गट आणि भाजपा सत्तेत असले तरीही त्यांच्यात सतत कुरघोडी सुरु असतात त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद अनेकदा समोर आला आहे. पण शिंदे गटातही काहीच आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. जमीन गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेले अब्दुल सत्तार यांनी आपल्याच पक्षातील आमदारांवर टिका करताना मंत्रिपद न मिळाल्यानं आमच्याच गटातील नेत्याचा माझ्याविरोधात कट केल्याचा आरोप केला आहे.

टीईटी घोटाळा, गायरान जमीन घोटाळा सुप्रिया सुळे यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सत्तार यांच्यावर जोरदार टिका होत आहे. अधिवेशात तर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या सर्व घडामोडीवर अब्दुल सत्तार यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहे. ते म्हणाले “मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु आहे. मी मुख्यमंत्र्यांना याची तक्रार दिली की आपल्या चर्चेतील गोष्टी बाहेर कशा जातात? पण याबद्दल मी बोलणार नाही. पण तो नेता महाराष्ट्रातील आहे. माझ्यावर देवाचा आशीर्वाद असल्यानं कदाचित मी या आरोपांमधून बाहेर पडू शकतो. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व माहिती दिली. त्यात काहीही नाही. पण माझ्यावर राजकीय सुडबुद्धीनं आरोप झालेत. असा दावा सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे सत्तार यांना अडचणीत आणणारा नेता कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

अब्दुल सत्तार यांनी यावेळी विरोधी पक्षावर देखील टिका केली. ते म्हणाले मला विरोधी पक्षाची केविलवाणी अवस्था बघून आश्चर्य वाटतं की, मी राज्यमंत्री असतानाही माझ्यावर त्यांनी अनेक आरोप केले. माझ्यावर राजकीय सुडबुद्धीनं आरोप झाले आहेत. याला उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणुन मी उत्तर मी दिले आहे. आपण कदाचित राष्ट्रवादीत न गेल्यामुळे अजित पवार माझ्या विरोधात जास्त आक्रमक झाले असावेत असे म्हणत सत्तार यांनी पवारांवर टिका केली आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या विधानाने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!