Latest Marathi News

आणि प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर उलटली

बस अपघात थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, हे ठरले अपघाताचे कारण

कोलकत्ता दि ९(प्रतिनिधी)- पश्चिम बंगाल राज्यातील कटवा येथे प्रवाशांनी खचाखच भरलेली बस उलडून झालेल्या अपघाता १ जण ठार तर ४० जण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पूर्व बर्दवान जिल्ह्यातील कटवा-बीरभूम महामार्गावर ही घटना घडली. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळते की, तुररळक वर्दळ असलेल्या रिकाम्या रस्त्यावरुन बस निघाली होती. बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. शिवाय बसच्या छतावरही लोक दाटीवाटीने बसले होते. बसवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले आणि बस उलटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कटवा-बीरभूम राज्य महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा प्रकृती गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर कटवा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, काहींवर उपचार करुन घरी पाठवण्यात आलं आहे. मृताची ओळख पटल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे. समोर आलेला व्हिडिओ खुपच थरारक आहे.

बस पलटी झाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि मदत व बचाव कार्य सुरु केले. चालकाला अटक करण्यात आली असून, बस ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस रोडवरती चालण्यासाठी पात्र होती का? याचा तपास पोलीस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!