Latest Marathi News
Ganesh J GIF

मंदिर परिसरात दिग्दर्शकाने या अभिनेत्रीचे घेतले चुंबन

अभिनेत्री आणि दिग्दर्शकाच्या त्या कृतीवर नेटकरी नाराज, पुजारीही संतापले, व्हिडीओ व्हायरल

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन यांचा मोस्ट अवेटेड ‘आदिपुरुष’ हा चित्रपट गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. या महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट आता दिग्दर्शकामुळे पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

आदिपुरुष या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी नुकत्याच तिरुपती बालाजी मंदिराच्या भेटीदरम्यान बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या गालाचे चुंबन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या टीमने तिरुपती येथे प्री रिलीजचा भव्य सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रभाससह चित्रपटाच्या टीमने बालाजी मंदिराला भेट दिली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, क्रिती, प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत मंदिरात दिसत आहेत आणि त्यानंतर स्टार कास्टची पूजा आटोपल्यावर टीम तिथून निरोप घेते आणि क्रिती सेननही चालायला लागते. येथे ओम राऊत तिला चुकीच्या पद्धतीने भेटतो. यानंतर त्याने क्रितीला ‘गुडबाय किस’ केले. मंदिराच्या आत अशा प्रकारे चुंबन आणि मिठी मारण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमुळे ओम राऊत यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. तर भाजपाने देखील या कृत्यावर टिका केली आहे.

आदिपुरुष १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत आहे, तर क्रिती सेनन माता जानकीची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील गाणी हिट होत असून आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!