Just another WordPress site

बेपत्ता मुलींचे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का?

मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणाबाबत खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल,उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात मुली सुरक्षित नसल्याचं एका धक्कादायक आकडेवारीमधून समोर आलं आहे. या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही आकडेवारी जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीतील आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याच्या वृत्तांमुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत सरकारने तातडीने काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. राज्यात तसेच देशातील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत आहे. याशिवाय मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले असल्याचे या वृतांवरून दिसत आहे. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का, असा सवाल खासदार सुळे यांनी उपस्थित केला आहे. या घटनेवर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का, असे म्हणत महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

GIF Advt

हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!