त्या कारणाने वडील रागावल्याने तरूणीने उचलले टोकाचे पाऊल
फिनाईल पिऊन आयुष्य संपवले, ओैरंगाबादमधील धक्कादायक प्रकार
ओैरंगाबाद दि २३(प्रतिनिधी)- ओैरंगाबादमध्ये मोबाइलच्या अतिवापरामुळे वडील रागावल्याने २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने फिनाईल प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मयत तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. औरंगाबाद शहरातील न्यू हनुमाननगर भागात ही घटना घडली आहे.
आरती सुनिल सिदलंबे असे मयत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयमध्ये आरती पदवीच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होती. तिला एक भाऊ आणि एक बहीण आहेत. आरती नेहमी मोबाईलमध्ये व्यस्त असायची, त्यामुळे काही दिवसापूर्वी आई -वडील दोघांनी तिची समजूत काढली होती तसेच मोबाईल गरजेपुरताच वापर कर, असे समजावूनही सांगितले होते.मात्र नंतरही आरती मोबाईचा अतीवापर करत होती.ते पाहून वडील आरतीवर रागावले. वडिलांचा राग आल्याने तिने स्वतःला आतील खोलीत कोंडून घेतले व घरातील फिनाईल प्रशान केले. तिला शासकीय घाटी रुग्णाल्यात हलविण्यात आले. घाटीत उपचार सुरू असतानाच आरतीचा मृत्यू झाला.
आजच्या जीवनात मोबाईल हा प्रत्येकाच्या हातात दिसून येतो. त्याचा वापर देखील तितकाच होत असतो. परंतु, अनेकजण मोबाईलच्या आहारी गेलले पहावयास मिळतात. त्यांना आजूबाजूला कोण आहे याचा देखील विचार नसतो. मोबाईलच्या आहारी गेल्यामुळेच आरतीने आत्महत्या केली आहे.