Latest Marathi News

आमदार निवासात शौचालयात धुतल्या जातात कपबशा

कपबशी धुतानाचा व्हिडीओ समोर, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

नागपूर दि २३(प्रतिनिधी)- दोन वर्षानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक कमालीचे आक्रमक दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केला आहे. यात एक वेटर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातले पाणी वापरत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. मिटकरींच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे.

व्हिडीओत एक वेटर कपबशा धुण्यासाठी चक्क टॉयलेटमधील पाणी वापरत असल्याचं दिसून येत आहे. हा वेटर टॉयलेटमधील बेसीनमध्ये कपबशा धूत आहेत. याच कपबशांमध्ये आमदारांना चहा दिला जात असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे.त्याचबरोबर ‘हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था. # आझादी का अमृत महोत्सव’,असे ट्विट मिटकरी यांनी केले आहे. त्याचबरोबर विधिमंडळातील ज्युस सेंटरसाठीची फळे देखील प्रसाधन गृहाजवळ साफ केली जात असल्याचा आणखी एक व्हिडिओ मिटकरी यांनी ट्विट केला आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या व्हिडिओचा पेन ड्राइव्ह सभागृहात सादर करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. विधीमंडळ परिसरात काचेच्या कपांऐवजी कागदी कप वापरले जावे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!