…म्हणून ‘या’ नेत्याने वाटल्या कोंबड्या आणि दारू
दारु चिकन वाटपाचा व्हिडिओ व्हायरल, लोकांनी काय केले एकदा बघाच
तेलंगाणा दि ७(प्रतिनिधी)- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रीय करणार असल्याची घोषणा केली आहे तेलंगाणा राष्ट्र समिती ऎवजी त्यांच्या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती असणार आहे. त्यामुळे पक्षातील नेते आणि कार्यकर्ते कमालीचे खुश आहेत. म्हणूनच एका नेत्याने जनतेला थेट दारू आणि चिकन वाटले आहे. या वाटपाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
न्यायालयानंतर निवडणूक आयोगानेही नेत्यांना मोफत किंवा लोकप्रिय घोषणा करण्यास मनाई केली आहे तरीही त्यातून मार्ग काढत काही नेते आपले सवंग राजकारण चालूच ठेवतात. टीआरएस नेते राजनाला श्रीहरी यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.त्यांनी त्यांच्या वारंगल मतदारसंघात लोकांना दारू आणि चिकनचे वाटप केले. विशेष म्हणजे मिळत चिकन आणि दारू घेण्यासाठी लोकांनीही लांबलचक रांग लावल्याचे दिसून आले.तब्बल दोनशे कोंबड्या चिकन आणि दोनशे दारूच्या बाटल्या यांचे वाटप करण्यात आले आहे. या वाटपाविषयी बोलताना राजनाला श्रीहरी म्हणाले की,’आम्हाला केसीआर यांना पंतप्रधान आणि केटीआर यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे’ पण विरोधकांनी मात्र या वाटपावर टिका केली आहे. यातून कोणते राष्ट्र घडवले जाणार आहे असा सवाल चंद्रशेखर राव यांना विचारण्यात आला आहे.तर काहींनी बाटली राष्ट्र समिती म्हणत या वाटपाचा निषेध केला आहे.
सध्या चंद्रशेखर राव आणि भाजपात जोरदार संघर्ष पहायला मिळत आहे. भाजपाला पर्याय देण्यासाठी त्यांनी आपला पक्ष राष्ट्रीय करण्याची घोषणा केली.त्यासाठी तेलंगाणा राष्ट्र समिती ऎवजी पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती ठेवण्यात आले आहे. त्या निमित्ताने या नेत्याने खुश होऊन दारु चिकन वाटले आहे.