फायदा होत नसल्याने भक्ताने केली मांत्रिक महिलेची हत्या
आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या, वर्षभरात संपल्या संपण्याएैवजी वाढल्या, भक्ताने मांत्रिकालाच संपवले
नाशिक दि ८ (प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावात मांत्रिक महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मांत्रिक महिलेने सांगितलेले सगळे उपाय करुनही काहीच लाभ व फायदा हाेत नसल्याने ही हत्या करण्यात आली आहे.
जनाबाई भिवाजी बर्डे असे या महिलेचे नाव आहे. त्या मजुरीचे काम करायच्या पण त्यांच्या अंगात देव असल्याने अनेकजण आपली अडचण घेऊन त्यांच्याकडे जात होत्या. त्याही त्या समस्यांचे निराकरण करत होत्या. याची माहिती झाल्यावर निकेश दादाजी पवार हा जनाबाई यांच्याकडे आपली समस्या घेऊन आला. तो वर्षभरापासून जनाबाईंकडे जात होता. मात्र सांगितलेले उपाय करुनही त्याला एकही लाभ झाला नाही. त्याच्या समस्येचे निराकरण झाले नाही. उलट समस्या जास्त निर्माण झाल्याने तो निराश झाला होता. शुक्रवार जनाबाईंचा समस्यांवर मार्ग सांगण्याचा वार असल्याने पवार त्यांच्याकडे आला होता. घरात आल्यावर त्याने जनाबाई बर्डे यांचा धारदार शास्त्राने वार करून खून केला. पण लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर त्याने लगेच तिथून पळ काढला. पण पोलीसांनी त्याला टोलनाका परिसरात अटक केली. घटनेच्या अवघ्या दहा मिनिटात त्याला ताब्यात घेण्यात आले.
परिसरात बुवाबाजीचे प्रकार घडत असून पोलिसांनी त्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तसेच महिलेच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.